vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

राज्य प्रतिनिधी-मुंबई,  मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या खेळाचे साहित्य क्रीडापटूंना उपलब्ध करून त्यांना सुविधा पुरविल्या जाव्यात, अशा सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

तालुका क्रीडा संकुल, श्रीवर्धन मतदार संघातील प्रलंबित तलाठी कार्यालय, इंदापूर येथे प्रस्तावित एमआयडीसी, एसएनडीटी कॉलेज वाडघर यासंदर्भात मंत्रालयात नुकतेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, मौजे धाटव येथे जे खेळाडू मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना संबंधित खेळाचे साहित्य व सुविधा उपलब्ध करून द्या. खो –खो व कबड्डी मैदानावर गोलाकार पत्राशेड व इतर कामे, बसण्यासाठी स्टेप्स, चेंजिंग रूम, पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय, भूमिगत पाण्याचा टँक बांधण्याची कामे जलगतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तालुका क्रीडा संकूल म्हसळा, रोहा, माणगाव येथील कामाचा आढावा घेतला.

श्रीवर्धन येथील तलाठी कार्यालयाच्या कामास मंजूरी असून, अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले. तसेच इंदापूर येथे प्रस्तावित एमआयडीसी, एसएनडीटी कॉलेज वाडघर यासंदर्भातील कामाचा आढावाही यावेळी मंत्री तटकरे यांनी घेतला.

यावेळी माणगाव तहसीलदार दशरथ काळे, किशोर देशमुख, महेंद्र वाकलीकर यांचे औद्योगिक विकास महामंडळाचे सहकार्यकारी अधिकारी कुणाल खेमराज यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग विदयार्थ्यांचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 3 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साही वातावरणात नोंदवला सहभाग-अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करा जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनेविविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे ‘खो-खो’ ला पाठबळ

vishwatmaklokswamivarta