vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग विदयार्थ्यांचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न

नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग विदयार्थ्यांचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न

          खेळ प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राद्वारे दिव्यांगांना समाजात स्वत:ची ओळख निर्माण करता यावी यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग मुलांनाही सामान्य मुलांप्रमाणेच खेळांचा आनंद घेता यावा या हेतूने इटीसी केंद्रातील विदयार्थ्यांच्या वार्षिक क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभागी झाले होते.

     या वार्षिक क्रीडा दिनाचे आयोजन इटीसी केंद्राच्या प्रांगणात सकाळी 8 ते 12.30 या वेळेत करण्यात आले होते. मानवंदनेने या क्रीडा दिनाची सुरुवात करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, इटीसी संचालक डॉ.अनुराधा बाबर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक क्रीडा दिनाची सुरूवात दीपप्रज्वलनाने ठाणे जिल्ह्यातील नामवंत मल्लखांब प्रशिक्षक श्री. किशोर म्हात्रे, इटीसी केंद्राचे व्यवस्थापक, केंद्र अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आली.

     यावेळी इटीसी केंद्रातील कर्णबधीर, मतिमंद, अंध, बहुविकलांग अशा सर्व विभागांतील वय वर्षे २ ते १८ वयोगटातील विदयार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुलांच्या दिव्यांगत्वामुळे येणा-या मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांना वाव मिळावा या पध्दतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये धावणे, हातामध्ये चमच्यावर लिंबू घेऊन चालणे, ससा उडी, टॉवर मेकिंग, सॉफ्ट थ्रोबॉल यासारख्या सहज खेळता येईल अशा क्रीडाप्रकारांचा समावेश होता.

  यावेळी सहा. आयुक्त तथा इटीसी केंद्र संचालक डॉ.अनुराधा बाबर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र व पदकचिन्हे वितरित करण्यात आली. विद्यार्थी राजा कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन अँड रिसर्च येथील शारीरिक शिक्षण प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांसाठी पंच म्हणून काम पाहिले. त्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

 दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या अंगभूत क्रीडा-कौशल्यांचा विकास होणे महत्वाचे असल्याची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांनीही दिव्यांग मुलांमधील सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतील व त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढेल असे मत व्यक्त केले आहे.

      त्यास अनुसरून हा वार्षिक क्रीडा दिन आयोजित करण्यात आलेला असून या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इटीसी केंद्रातील मतिमंद व कर्णबधिर विभागांचे शैक्षणिक व्यवस्थापक अनुक्रमे श्री. दीपक नवगरे आणि श्रीमती विद्या कदम तसेच क्रीडा शिक्षक श्री. सुभाष भुसारा व श्री. समीर म्हात्रे यांनी केले. केंद्रातील सर्व कर्मचा-यांनी आपल्या विविध जबाबदा-या पार पाडत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. विशेष म्हणजे दिव्यांग मुलांसह त्यांच्या पालकांनीही या उपक्रमाचा आनंद घेतला.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनेविविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

जिल्हा क्रीडा संकूलातील अथलेटिक्स खेळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक नियुक्तीसाठी 31 मे पर्यंत अर्ज करा- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील बैठकीत आदेश

क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

vishwatmaklokswamivarta