vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

उन्हाळी सुट्टीमध्ये नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीरातून तंत्रशुध्द खेळाचे धडे 

उन्हाळी सुट्टीमध्ये नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीरातून तंत्रशुध्द खेळाचे धडे

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षण विभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये विविध खेळ तसेच खेळामधील बारकावे शिकता यावेत याकरिता विविध खेळांच्या विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

 महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना कबड्डी, खो-खो, तायक्वांदो व फुटबॉल या खेळांची मोठ्या प्रमाणात आवड असल्याने व त्यामध्ये गती असल्याने त्यांना या खेळाबाबत तंत्रशुद्ध माहिती मिळावी व शास्त्रशुध्द प्रशिक्षण लाभावे याकरिता सदर उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये 4 क्रीडा प्रकारांतील तज्ज्ञ व अनुभवी क्रीडा मार्गदर्शकांकडून खेळातील बारकावे शिकायला मिळत असल्याने त्याचा फायदा नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच मिळणार आहे व याचा उपयोग महानगरपालिकेची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचाविण्यासाठी होणार आहे.

 यामध्ये कबड्डी खेळाचे प्रशिक्षण नमुंमपा शाळा क्र. 76/105 घणसोली येथे व खो-खो खेळाचे प्रशिक्षण नमुंमपा शाळा क्र.41 अडवली- भुतवली येथे तसेच फुटबॉल व तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण नमुंमपा शाळा क्र.36/122 कोपरखैरणे या शाळांमध्ये दिले जात आहे.

या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष लाभ कबड्डी खेळासाठी 31, खो-खो साठी 28 व तायक्वांदोसाठी 89 तसेच फुटबॉल खेळासाठी 86 अशाप्रकारे एकूण 234 मुले व मुली घेत आहेत. या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीने प्रशिक्षणाच्या ठिकाणी सकस नाश्ता तसेच टी- शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट अशा खेळाचा पोशाख देण्यात आला आहे.

  2 मे पासून सुरू झालेले हे शिबीर 15 मे पर्यंत सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत संपन्न होत असून प्रत्येक खेळाकरिता 02 अनुभवी प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या प्रशिक्षकांसोबत क्रीडा विभागातील सहा. मार्गदर्शक तसेच प्रशिक्षकही हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मदत करत आहेत.

 प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यासाठी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले असून या क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन करीत प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.  सदर विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम. अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व क्रीडा विभागातील इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

संबंधित पोस्ट

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे थाटात उद्घाटन

कबड्डी असोसिएशनच्यावतीने स्पर्धा

एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक.! बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

vishwatmaklokswamivarta

खासगी क्रीडा अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta