vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

कबड्डी असोसिएशनच्यावतीने स्पर्धा

कबड्डी असोसिएशनच्यावतीने स्पर्धा

जालना प्रतिनिधी

: निवड चाचणी स्पर्धा 2025’ महाराष्ट्र राज्य वरिष्ठ व वरिष्ठ गट पुरुष व महिलाच्या स्पर्धा महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट (पुरुष व महिला ) च्या स्पधर्र्ेमध्येे 19 ते 23 मार्च 2025 विश्वास सामाजिक संस्था, ठाणे येथे घेण्याचे असोसिएशनने निश्चित केले आहे. या स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याचा कबड्डी संघ वरिष्ठ गट (पुरुष व महिला) संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी पुरुष खेळाडू वजन 85 किलो, महिला खेळाडू वजन 75 किलो असावे असा निकष पूर्ण करणार्‍या खेळाडूंना स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल. स्पर्धेसाठी आवश्यक आधार कार्ड, जन्माचा दाखला याशिवाय खेळाडूंना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. तरी सर्व संघाच्या व्यवस्थापकांनी आपल्या संघाची नोंदणी राहुल वाहूळे : 9823775802 बाबासाहेब मंडाळे 9823661861 यांच्याकडे करावी. या स्पर्धेचे ठिकाण जिल्हा परिषद शाळा, पिरपिंपळगाव राजूर रोड, ता. जालना असून ही स्पर्धा 09 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. उशीरा आलेल्या संघाचा विचार केला जाणार नाही याची नोंद संघ व्यवस्थापकांनी घेऊन वेळेवर नोंद करून सहकार्य करावे. स्पर्धेसाठी मुला मुलींच्या संघासाठी 200 रुपये नोंदणी फी आकारण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन कबड्डी असोसिएशनचे घनश्यामसेठ गोयल, अशोक पांगारकर, अक्षय गोरंट्याल, प्रशांत तेलगड, डॉ. अशोक हजारे, नंदकिशोर खर्डेकर, डॉ. देवेश पाथ्रीकर, माधवी काळे, राहुल वाहुळे, बाबासाहेब मंडळे, रामदास निहाळ यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ”… 

नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग विदयार्थ्यांचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

क्रीडा प्रशिक्षण शिबीर १२ मे पासून

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट स्पर्धेचा समारोप…

vishwatmaklokswamivarta

खासगी क्रीडा अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन