vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

 

जालना, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कारासाठी ऑनलाईन सूचना व हरकती सादर करण्याचा सुरुवातीचा दि. 15 फेब्रुवारी,2025 तर सुचना व हरकती सादर करण्याचा अंतिम दि. 18 फेब्रुवारी,2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहिल. तरी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार गुणांकन तक्ते अवलोकनासाठी व सूचना/ हरकती सादर करण्यासाठी ऑनलाईन https://shivchhatrapatiawards.com या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने दि.29 डिसेंबर,2023 व दि.25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेले असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासननिर्णय क्रं.शिछपु.2023/प्र.क्रं.188/क्रीयुसे-2, दि.29 डिसेंबर,2023 मधील नियम क्रं.1.19, नियम क्रं.1.20, नियम क्रं.1.21 अनवये एकूण गुणांकनासह दि.15 ते 18 फेब्रुवारी,2025 या कालावधीत सूचना व हरकतीसाठी https://shivchhatrapatiawards.com या लिंकवर प्रसिध्द करण्यात येत आहेत. सदरचे प्राथमिक छाननी अहवाल हे अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व हरकतींनुसार बदल होऊ शकतो, तसेच सूचना/ हरकतीनंतर सदरचा अहवाल पुन्हा प्रसिध्द करण्यात येणार नाही. प्राथमिक छाननी अहवालात केलेल्‍या पुरस्कार गुणांकनाबाबत काही आक्षेप किंवा सूचना असतील तर नमुन्यात सादर कराव्यात.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :

पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे· पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्काराने सन्मान..

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा-स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta