vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

 

       मुंबई, प्रतिनिधी – दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

 या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही ( वाचन )आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला.

 आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.आपले व्हिडिओ इथे पाठवा ईमेल: *dgiprdlo@gmail.com या ईमेलवर अथवा या व्हॉट्सअँप क्रमांकावर. ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६.

महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. 98 वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल -👉 महासंवाद – https://mahasamvad.in/  👉 एक्स – https://twitter.com/MahaDGIPR 👉 फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR 👉 इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/mahadgipr 👉 युट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR👉 टेलिग्राम चॅनल – https://t.me/MahaDGIPR

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा