vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा…

मुंबई, प्रतिनिधी: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली.

राज्यातील सुमारे १५० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून त्यातील काहींशी आज रात्री उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला. नेपाळमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या समूहाशी संवाद साधत त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला.

राज्यातील मुरबाड तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकले असून त्यांच्याशी देखील श्री. शिंदे यांनी मोबाईलवरून संवाद साधला आणि त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

…पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळीवारे वाहण्याची दाट शक्यता… हवामान खात्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेटआदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या कारवाई सुरूच

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

vishwatmaklokswamivarta