vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

मुझफ्फरपूर प्रतिनिधी- शेतकरी शेतात राबतात म्हणून आम्हाला अन्नधान्य मिळू शकते.शेतकऱ्यांच्या जीवावर देश जगत आहे .नसेल किसान तर कसे होईल जीवन आसान ? त्यामुळे शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबूत उभे आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनाला किमान आधारभूत किंमत एस एस पी निश्चित करून शेतीशी जोडलेल्या विविध शेतीउद्योगांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.बिहार मधील मुझफ्फरपूर येथील मोतीपुर गावात कोल्ड स्टोरेज आणि वेरहाऊस

चे उद्घाटन ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले त्यावेळी झालेल्या सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैशाली जिल्ह्याच्या खासदार वीणा देवी; बिहार चे पंचायत राज्य मंत्री केदार प्रसाद गुप्ता; जलसिंचन मंत्री संतोष कुमार सुमन; आमदार अरुण कुमार; आमदार राजकुमार सिंह; नीलम शर्मा; अशोक कुमार सिंह; ललितकुमार साही उर्फ गोपाळ बाबू; अजय कुमार; एन के सिंह; चंद्र भूषण प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा उद्धार करणे हे ध्येय्य आहे मोदी सरकार च्या गाठीशी म्हणूनच आम्ही आहोत ताकदीने त्यांच्या पाठीशी असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले . मुझफ्फरपूर जिल्ह्यातील शेती; शिक्षण ; आरोग्य सुविधा ; रस्ते आणि मूलभूत सर्व सुविधांचा आढावा घेण्यासाठी पी एम ओ कार्यालयाने ना. रामदास आठवले यांना बिहार मधील मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठवले होते.

त्यानुसार ना.रामदास आठवले यांनी आज मुझफ्फरपूर चा दौरा केला यावेळी मुझाफरपुर मध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन केंद्र आणि राज्य सरकार च्या विविध योजनांच्या अंमलबजावणी चा आढावा ना. रामदास आठवले यांनी घेतला.सर्वांना शिक्षण चांगले आरोग्य ; रेशन अन्नधान्य; चांगले रस्ते ; पाणी; रोजगार मिळावा याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.दलित ओबीसींना केंद्र सरकार च्या सामजिक न्याय मंत्रालयाच्या विविध कल्याणकारी योजनांचा ना. रामदास आठवले यांनी आढावा घेतला. सरकारी योजना चांगल्या राबवून सर्व गावांना ; ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत च्या सूचना ना.रामदास आठवले यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

संबंधित पोस्ट

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहिले जावे – सचिव, शालेय शिक्षण

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभशेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्नशिल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारापार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर