vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

            नवी मुंबई, प्रतिनिधी:- अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभागाच्या कार्यक्षेत्रातील 21 रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावरुन 3 मार्च, 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरावेत. असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई यांनी कळविले आहे.

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीनुसार अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभागाच्या कार्यक्षेत्रातील 21 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिशः (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. विहित पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. तसेच अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार अर्जदाराला शुल्क भरावे लागेल.

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे दूरध्वनी/भ्रमणध्वनी कॉल करत नाही. उमेदवारांशी पत्रव्यवहार करावा लागला तर संबंधित प्राधिकरणाद्वारेच केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती,नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नये. कोणत्याही अनैतिक दूरध्वनी/भ्रमणध्वनी कॉल्सपासून सावध राहावे. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संकेत स्थळावरुन भरावेत. अधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in या संकेस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन नवी मुंबई डाकघर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे केले आहे.

0000000000000

संबंधित पोस्ट

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा वमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आजच्या या पावसाच्या दिवसात एअरटेलची सेवा ठप्प! नेटवर्क डाऊन, युझर्स फोन करुन कंटाळले

vishwatmaklokswamivarta

उद्योजक मेळाव्यासाठी नोंदणी करा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांची कौशल्य विकास कार्यालयाला भेट