vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप श्रीहरी रसाळ महाराज यांचे आज हरिकिर्तन

प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप श्रीहरी रसाळ महाराज यांचे आज हरिकिर्तन

जालना/प्रतिनिधी-आपल्या जीवनात गुरुला अनन्य साधारण महत्व असून आपल्या जीवनात गुरु असलाच पाहिजे. नव्हे तर तो आपण केला पाहिजे, असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.

श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे चौथे पुष्प गुफतांना बोलत होते. यावेळी संस्थानचे सचिव संपतराव पाटील, शिरिष सांगोळे, हभप तुकाराम महाराज मुंढे, हभप आत्माराम महाराज बिडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना जोशी महाराज म्हणाले की, लग्न जुळतांना पत्रिका जरी जुळली तरी गुरु जुळत नसल्यामुळे लग्न मोडल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. गुरु चांगला असेल तर आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे आपल्या जीवनात गुरुला अनन्य साधारण असे महत्व असल्याचेही जोशी महाराज म्हणाले.

दरम्यान, किर्तन सेवेत श्री हभप दिनेश महाराज उंडे यांनी, सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला। नाही तरी गेला, जन्म वाया॥ ह्या तुकाराम महाराजांच्याा अभंगावर निरुपन केले. ते म्हणाले की, जो विठ्ठला भजतो तोच या जगात तारल्या जातो. अन्यथा नाही. म्हणून प्रत्येक जीवाने विठ्ठल नाम घेतले पाहिजे, त्याला आपला जीव ओवाळून टाकला पाहिजे, तरच अशा जीवाचे भले आहे. अन्यथा नाही.

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक सत्संगाकरिता दिल्लीस रवाना

vishwatmaklokswamivarta

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ

गुरुपौर्णिमे निमीत्त दत्त मंदीर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

श्रीसूक्त स्तोत्राचे महत्व🌹 *सुख – समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्रीसूक्त

vishwatmaklokswamivarta

निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति-आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज…

श्री रूद्राभिषेक महत्त्व- अध्यात्मिक वार्ता-