vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने,पेनटाकळी येथील गावकऱ्यांचे उपोषण मागे.. 

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने,पेनटाकळी येथील गावकऱ्यांचे उपोषण मागे..

राज्य प्रतिनिधी

बुलढाणा- पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर गेल्या बारा दिवसांपासून गावठाण हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण गावठाण हद्दवाढ प्रकरणाचा निवाडा मान्य झाल्याने केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.

पेनटाकळी गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले. सिंचन प्रकल्पाच्या खालच्या बाजूच्या गावाचे पुनर्वसन नियमानुसार होऊ शकत नाही. त्यामुळे गावठाण हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. हद्दवाढ मागणीसाठी पेनटाकळी येथील गावकऱ्यांनी बेमुदत उपोषण आरंभले होते. याची दखल घेत आज केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी उपोषण स्थळी गावाकऱ्यांशी संवाद साधला.

त्यावेळी ते म्हणाले की, भूमी अभिलेख खात्याने संबंधित जागेचे सीमांकन करावे. शासकीय अभियंत्यांची मदत घेऊन आराखडा तयार करण्यात यावा. या जागेवर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायतने काढावे, त्यासाठी पोलीस निरीक्षक साखरखेर्डा यांनी योग्य तो बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. ग्रामसभा घेऊन सर्वांच्या सहमतीने सदर भूखंडाचे वाटप ग्रामपंचायतने करावे,

असे निर्देश दिले.यावेळी स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.000

संबंधित पोस्ट

नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट

vishwatmaklokswamivarta

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान**नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७,००० वृक्ष ‘बेपत्ता’!

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘एसओपी’ निश्चित करणार – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी*मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव”

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित..

vishwatmaklokswamivarta

स्टॉप डायरिया’ अभियानाचा शुभारंभ • जिल्ह्यातील १.८४ लाख बालकांना झिंक गोळ्या व ओआरएसचे वितरण   • ३१ जुलैपर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियान’