महाआरोग्य शिबिर- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२५-
पुणे प्रतिनिधी
जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२५ निमित्त, शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान या सेवाभावी संस्थेच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर ज्येष्ठ कृष्ण सप्तमी ते ज्येष्ठ कृष्ण एकादशी, शके १९४७ या कालावधीत म्हणजेच १८ ते २१ जून २०२५ दरम्यान, देहु – आकुर्डी – नाना पेठ (पुणे) येथे आयोजित करण्यात आले होते.
या ४ दिवसीय आरोग्य शिबिरात हजारो हून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीसह विविध आजारांवर उपचार देण्यात आले आणि १०,००० पेक्षा अधिक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना अत्यंत मोलाची वैद्यकीय सेवा मिळाली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा सारथी फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, शिवसेवक वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेवक विद्यार्थी कक्ष, डॉ. शितल सुनिल आवटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेषतः शिबिरासाठी औषध, तज्ज्ञ डॉक्टर, स्वयंसेवक, तपासणी साहित्य, पाणी व विश्रांती व्यवस्था आदींचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते.
शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट : वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची तात्काळ तपासणी व मोफत औषधोपचार, वयस्क, स्त्रिया, बालकांसाठी आरोग्य सेवा, प्रसंगी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा तत्परतेने उपलब्ध करून देणे.
शिबिरातील सेवा व सुविधा : सामान्य आरोग्य तपासणी – ताप, थकवा, अशक्तपणा, जंत व संसर्गजन्य रोग, औषध वाटप विभाग – सर्व तपासणींच्यानंतर मोफत औषधे, प्राथमिक उपचार केंद्र – काप, मलम, बॅन्डेजेस, फर्स्ट एड किट्स अश्याप्रकारे सेवा देण्यात आली.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे बोलताना म्हणाले संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे संरक्षण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले. त्यांचेच विचार अविरत चालू ठेवण्याचा प्रयत्न म्हणून वारकरी यांची आरोग्याची काळजी करणे हे आमचे कर्तव्य व वारी ही केवळ अध्यात्मिक यात्रा नसून ती सेवा, त्याग आणि सामाजिक बांधिलकीचाही आदर्श आहे. या वारीत सहभाग घेतलेल्या प्रत्येक वारकऱ्याचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले. भविष्यात राज्यभर वारी मार्गावर अशी सेवा सुरू ठेवू.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे, सेवा सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार मांडगे, राज्य समन्वयक सुचेता भिसे, पुणे जिल्हा समन्वयक मयुरी जायप्पा, मावळ विभाग प्रमुख संतोष होजगे, तसेच डॉ. गणेश घोंगटे, डॉ. शुभांगी घोंगटे, शिवकुमार वाघमारे, त्रिलोक कोडे, अभिषेक नवले, राजवर्धन करांडे आणि अनेक डॉक्टर व स्वयंसेवक उपस्थित होते.