vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

क्रीडा प्रशिक्षण शिबीर १२ मे पासून

क्रीडा प्रशिक्षण शिबीर १२ मे पासून

 

गडचिरोली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने १२ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत दोन टप्प्यांमध्ये क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिला टप्पा १२ ते २१ मे आणि दुसरा टप्पा २२ ते ३१ मे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबीर जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स एरिया, क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा स्टेडियम, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी ५.३० ते ८.०० आणि सायंकाळी ५.३० ते ८.०० या वेळेत होईल.

या प्रशिक्षण शिबिरात कुस्ती, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, खो-खो, कबड्डी, मैदानी खेळ व बॉल बॅडमिंटन अशा विविध खेळांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. १० वर्षावरील सर्व मुलामुलींना या शिबिरात सहभागी होता येईल.

शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करून दि. ११ मे २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करावी व जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

उन्हाळी सुट्टीमध्ये नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीरातून तंत्रशुध्द खेळाचे धडे 

फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह विशेष उपक्रमात सहभाग नोंदवावा

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांच्या प्रस्तावासाठी 11 एप्रिल मुदत…

आशियायी ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सर्व्हिन सेबॅस्टियननं भारतीय पदकांचं खातं उघडताना, पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील बैठकीत आदेश