vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह विशेष उपक्रमात सहभाग नोंदवावा

फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह विशेष उपक्रमात सहभाग नोंदवावा

ठाणे, प्रतिनिधी:- भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह’ विशेष उपक्रमांतर्गत 10 कि.मी. व 25 कि.मी. असे दि.24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 06 वाजता साकेत मैदान येथून सुरू करण्यात येवून त्याच ठिकाणी ड्राईव्ह परत येवून पूर्ण करण्यात येणार आहे. ही ड्राईव्ह ठाणे पोलीस आयुक्तालय व ठाणे शहरातील नागरिकांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येणार असल्याने या ड्राईव्हमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सायकलिंग ड्राईव्हचा मुख्य हेतु पोलीस दल व नागरिकांमध्ये ‘फिटनेस की डोस, आधा घंटा रोज’ व फिटनेसला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे.तरी ठाणे शहरातील महाविद्यालयातून जास्तीत जास्त संख्येने शिक्षक/विद्यार्थी यांनी स्वतःच्या सायकलसह सहभाग घेवून ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह’ या विशेष उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन सहायक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा क्रीडा संकूलातील अथलेटिक्स खेळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक नियुक्तीसाठी 31 मे पर्यंत अर्ज करा- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

कबड्डी असोसिएशनच्यावतीने स्पर्धा

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

एकविध खेळ संघटनांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुरुष गटात लातूर व महिला गटात पुणे विभागांचे संघ,नमुंमपा चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपदाचे मानकरी..

vishwatmaklokswamivarta