vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळस्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ”… 

नवी मुंबई महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ”…

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.यामध्ये नवी मुंबई शहरातील शालेय विद्यार्थ्यांपासून, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सहभागी होता येईल अशा स्वरुपाच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

 नवी मुंबई मधील पुर्वीचे गाव व शहरी भाग यातील ४० वर्षा वरील खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ५७ संघांनी सहभाग घेतला आहे. ४०+ क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने प्लॉट नं.४,सेक्टर-१५ ए, बेलापूर येथील मैदानावर आयोजन करण्यात आले.

   या स्पर्धेचा शुभारंभ मा.ना.श्री.गणेशजी नाईक मंत्री,वने महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, उप आयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील,कार्यकरी अभियंता श्री.मदन वाघचौडे, उप अभियंता श्री.पंढरीनाथ चवडे, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, ४०+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रदिप पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  स्पर्धेच्या शुभारंभा प्रसंगी मा. ना.श्री.गणेशजी नाईक यांनी नवी मुंबई शहरात ४०+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नेहमीच उत्तम सामाजिक कामे केली जातात याबद्दल असोसिएशनचे कौतुक केले तसेच वयाच्या ४० वर्षांनंतर सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देवून आनंदी आयुष्य जगता यावे यासाठी निर्व्यसनी राहून जमेल तेवढे खेळावे, चालावे तसेच दररोज व्यायाम, योगा, प्राणायाम करावेत. विशेषतः सर्वांनी तीन-तीन महिन्याने आरोग्याची तपासणी करून त्यानुसार तात्काळ उपचार करावेत त्यामध्ये दिरंगाई करू नये याबाबत मार्गदर्शन केले.

 आज नवी मुंबई महानगरपालिका चषक ४०+ क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील क्रिकेट प्रेमींना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र घेऊन शहराच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे असे मत व्यक्त केले.

   दरम्यान दि.२८ फेब्रुवारी ते ०२ मार्च,२०२५ या कालावधीत खेळवले जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी संघांना व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

समता पंधरवाडात विविध उपक्रमाचे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणक्षेत्रात अनधिकृत भूखंड, बांधकामाचे होणार सर्वेक्षण- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेØ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने करणार सर्वेक्षणØ विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे वाचन*

vishwatmaklokswamivarta