vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी ‘सीईटी २०२५’ जाहीर

न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी ‘सीईटी २०२५’ जाहीर

मुंबई, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेपूर्व प्रशिक्षणाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘सीईटी २०२५’ जाहीर करण्यात आली आहे.

यासाठीची जाहिरात २९ जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया दि. १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २० मे रोजीच्या आदेशानुसार, ‘न्यायिक सेवा सीजे-जेडी’ व ‘जेएमएफसी’ परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कायदेशीर सराव अनिवार्य करण्यात आला आहे.

त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सादर करताना सनद आणि न्यायालयीन सरावाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आधीच ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांनी अर्जाची प्रत, सनद आणि अनुभव प्रमाणपत्र २५ ऑगस्टपर्यंत bartijmfc@gmail.com या ईमेलवर सादर करणे बंधनकारक आहे.

निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराचा ‘सीईटी २०२५’ साठी विचार केला जाणार नाही, अशी माहिती बार्टी संस्थेकडून देण्यात आली आहे.

****

संबंधित पोस्ट

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड…

अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला तातडीने द्या ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शिराळा, चांदोलीसाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठीअन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार यांनी घेतला महानगरपालिका निवडणुकीचा आढावा -जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिली आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती • आचारसंहिता, स्ट्राँग रूम आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत नोडल अधिकाऱ्यांशी साधला संवादमतदान प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवा- मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार