vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळठळक बातम्याप्रदेश

एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक.! बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक.! बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

बुलढाणा,द प्रतिनिधी : सिंगापूर येथे दि.15 ते 20 जून दरम्यान एशिया कप स्टेज टू तिरंदाजी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारतीय संघाला रौप्य पदक मिळाले असून या संधात सहभागी असलेल्या बुलढाण्याचा तिरंदाज मिहीर नितीन अपार याने जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेतली.

भारतीय संघामध्ये बुलढाण्याचा तिरंदाज मिहीर नितीन अपार हरियाणाचा कुशल दलाल व आंध्र प्रदेशचा गणेश मनीरत्नम यांचा समावेश होता. मिहीर अपार याने यापूर्वी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. तसेच ऑगस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कॅनडासाठी सुद्धा मिहीर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिहीरच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतूक होत असून जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनीही यावेळी कौतूक करुन शुभेच्छा दिल्या. मिहीरने आपल्या या यशाचे श्रेय कोच चंद्रकांत सलग आणि त्यांच्या आई-वडिलांना दिले आहे.

००००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – सहकारमंत्री बाबासाहेब पाटील* अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण* शहराच्या वैभवात भर घालणारे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन* न्यायालय इमारत आणि भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा

वारकऱ्यांच्या सुरक्षितता, सुविधांना प्राधान्य देऊन समन्वयाने नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta