vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी: केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार 1 एप्रिल 2025 पासून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात. हा पुरस्कार दरवर्षी देशभरातील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना (वय वर्षे 5 ते 18) सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो.शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कला व संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्कारासाठी कोणतेही भारतीय नागरिकत्व असलेले व भारतात वास्तव्यास असलेले 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुले पात्र आहेत. अर्जदार स्वतः अर्ज करू शकतात तसेच इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेद्वारे त्यांचे नाव नामांकनासाठी सुचवले जाऊ शकते. केंद्रीय मंत्रालयानी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 ठेवली आहे. अधिक माहितीसाठी (https://awards.gov.in) या वेबसाइटला भेट द्यावी.

दरवर्षी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे या पुरस्कारांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विविध क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना गौरविण्यात येते.

०००

संबंधित पोस्ट

महावितरणच्या जरीदा उपकेंद्रामुळे ५० गावाचा विजेचा प्रश्न सुटला*सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश भुषण गवई यांचे विशेष प्रयत्न..

मुंबईत धारावी विभागात भाजपा जिल्हा सचिव रमेश नाडार जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना इडली बनवण्याचे भांडे वाटप केले

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज सहकार मंथन बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मागणी

उष्णतेच्या लाटेबाबत जिल्हा प्रशासनाचा इशारा

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta