vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांची लाईफ लाईन महत्त्वाची बातमी; रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर लोकल फेऱ्यांमध्ये बदल होणार

मुंबईकरांची लाईफ लाईन महत्त्वाची बातमी; रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर लोकल फेऱ्यांमध्ये बदल होणार

मुंबई प्रतिनिधी- रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये बदल होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि ‘सीएसएमटी’ ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर कसा असेल मेगाब्लॉक

सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग: अप आणि डाऊन धीमा

वेळ : स. 10.55 ते दु. 3.55

परिणाम : ब्लॉकवेळेत अप, डाऊन

धीम्या लोकल अप, डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरवरून पुन्हा अप-डाऊन धीम्या मार्गावर धावतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही २० मिनिटे विलंबाने धावतील. हार्बर रेल्वे मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्ग : अप आणि डाऊन  वेळ : स. 11.40 ते दु. 4.40  परिणाम : सीएसएमटी/वडाळा ते

वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल रद्द राहणार आहेत. हार्बरवरील प्रवाशांसाठी पनवेल ते कुर्त्यावरून (फलाट क्रमांक ८) विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मुंबई-गांधीधाम विशेष फेऱ्या -प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते गांधीधाम विशेष तेजस सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या 10 साप्ताहिक फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 09017 मुंबई सेंट्रल ते गांधीधाम मुंबईहून रात्री 11.20 वाजता सुटेल आणि गांधीधाम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.55 वाजता पोहोचेल. 2 जून ते 30 जूनदरम्यान दर सोमवारी ही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 09018 गांधीधाम-मुंबई सेंट्रल ही गाडी 3 जून ते 1 जुलैदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे.

विशेष गाडी गांधीधामवरून सायंकाळी 6.55 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता पोहोचेल. विशेष गाडीला प्रथम वातानुकूलित, द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित असे डबे असणार आहेत. विशेष गाडीचे आरक्षण खुले झाले असून, अधिक माहितीसाठी पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्या.

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे रोजगार निर्मिती ला प्राधान्य ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रेल्वेने विनातिकीट प्रवास केल्यास आता दुप्पट दंड! लवकरच अधिसूचना होणार जाहीर