vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटनेत सुदृढ व आनंदी जगण्याची गुरुकिल्ली व्याख्यान संपन्न* 

*सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटनेत सुदृढ व आनंदी जगण्याची गुरुकिल्ली व्याख्यान संपन्न*

 

मुंबई प्रतिनिधी –

ज्येष्ठांचे आयुष्य व जीवनमान तणाव मुक्त निरोगी व सकारात्मक कसे जगावे त्यासाठी आहार विहार विचार यांचे तंत्र जाणून घेण्यासाठी माधवबाग संयुक्त विद्यमाने सेवाधारी नागरिक संघटना नेरूळ सीवूड कार्यालयात  एका खास व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माधवबागचे ज्येष्ठांचे मेडिटेशन हेल्थ स्पीकर मार्गदर्शक डॉ. श्री मिलिंद सरदार यांनी ज्येष्ठांची जीवनशैली आरोग्य आहार विहार विचार यावर आधारित सकारात्मक जीवनाचा व सुदृढ आरोग्याचा मार्ग स्वतःकडेच आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही वस्तुस्थिती बदलायची असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी त्याकरिता काही तंत्र आहे त्याचा वापर प्रात्यक्षिक दृष्ट्या ज्येष्ठांनी केल्यास सुख शांती आरोग्याच्या तक्रारी राहणार नाही असे मनोगत डॉ मिलिंद सरदार यांनी जेष्ठ ना मार्गदर्शन करताना व्यक्त केली यावेळी संघाचे अध्यक्ष श्री सुधाकर पाटील यांनी डॉ मिलिंद सरदार यांचे स्वागत केले, सेवाधारी संघटने बद्दलची सद्यस्थिती समजावून सांगितली व सर्व ज्येष्ठांना चांगल्या रुग्णालयाच्या सेवा उपलब्ध व्हावे यासाठी संघटना प्रयत्नशील आहे तर उपाध्यक्ष श्री सुरेश पोटे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री मिलिंद सरदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत परिचय करून दिला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुणे मार्गदर्शक व जनसमुदायाचे आभार श्री दिलीप गाडेकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सुरेश पोटे, अनिल उबाळे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला दरम्यान उपस्थितताना चहा आणि नाष्टा देण्यात आला यावेळी खारघर मधील आयटीएम कॉलेजच्या मॅनेजर यांनीही अधिष्ठानकडून सर्व माहिती सर्वेरूपी भरून घेतली त्या माहितीच्या आधारे ज्येष्ठांचे जीवन दैनंदिन व्यवहार आजारपण या विषयावर माहिती संकलित होणार आहे असे श्री पोटे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला .पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. 

मुंबईत येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट – महापौर श्रीमती रितू तावडे

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर अचानक भेट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन,थेट पंपांवर जाऊन केली इंधन साठ्याची प्रत्यक्ष तपासणी !साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा !

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध