vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे जिल्हा न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा

मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे जिल्हा न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा

        सांगली, प्रतिनिधी: धावपळीच्या युगामध्ये मानवाचे शारीरिक स्वास्थ्य खालावत आहे. यावर मात करण्यासाठी योग धारणा उत्तम व सोपा पर्याय आहे. योगामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ उत्तम राहते. फक्त जागतिक योग दिनाच्या दिवशीच योगा व व्यायाम न करता सर्वांनी रोज एक तास तरी व्यायाम करावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी केले.

  जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, विजयनगर येथील आवारात जिला न्यायालय सांगली, विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील बार असोसिएशन सांगली, न्यायालयीन कर्मचारी संघटना सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. काबळे, न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक महेश गुर्लहसूर, सहाय्यक सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे, श्री. व्ही . डी. निंबाळकर, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, सर्व न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी आदि उपस्थित होते.

  यावेळी सहाय्यक सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे यांनी योग दिनाचे महत्व उपस्थितांना सांगितले व मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याकरीता नियमित एक तास योग व्यायाम करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी योगासनाचे विविध प्रात्यक्षिक प्रकार उपस्थितांना करवून दाखवले व सर्व उपस्थितांनी याचा लाभ घेतला.

      कार्यकमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक महेश गुर्लहसूर, सहाय्यक कर्मचारी संतोष खांदारे, नितिन आंबेकर, विजयकुमार माळी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मारुती बुरूंगले यांनी मानले.

00000

संबंधित पोस्ट

पर्यटकांसाठी सूचना-“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट”या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…

संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींवर तात्काळ उपचार ; १०२ आणि १०८ रुग्णवाहिकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण …

जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात