vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कराड येथे 22 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

कराड येथे 22 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा प्रतिनिधी भास्कर फास्ट करतो मस्ती करू नका गीता जागतिक युवा कौशल्य सप्ताहानिमित्त सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 22 जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व शिक्षण मंडळ, कराड संचालितक महिला महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालय, कराड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल व अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 1500 जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी 22 जुलै रोजी आपले शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी

समाज कल्याण विभागांतर्गंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरूऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन..

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय-स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेत महाराष्ट्राच्या सागरी विकासाची दिशा

vishwatmaklokswamivarta

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta