vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जालना प्रतिनिधी: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 13 ते 16 ऑगस्ट 2025 रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालिन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-000000

संबंधित पोस्ट

युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट*स्थलांतरीत मजूरांच्या पाल्यांच्या संगोपन उपक्रमाची पाहणी,बालकांचे बालपण जपणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी- आयुष्मान खुराणा…

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाचे लोकार्पण-अवयव प्रत्यारोपण सुविधेसह सर्व सुविधा उपलब्ध करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ००घाटीच्या विकासासाठी एकत्रित निधी देणार- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देशकामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश..

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत-अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत