vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाज्योती’च्या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसादओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी,विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली.

महाज्योती’च्या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसादओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी,विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली…

ठाणे,द प्रतिनिधी- राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास (एसबीसी) प्रवर्गातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी, याकरिता परीक्षेच्या पूर्व तयारीकरिता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. 2025-26 सत्रासाठी ‘महाज्योती’ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मचारी निवड आयोग (एसएससी-सीजीएल), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) आणि भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) तर्फे असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ) या पदासाठी 28 जुलै 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.

इच्छुक विद्यार्थ्यांना www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर 20 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्जाची शेवटचा दिनांक असताना राज्यभरातून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ‘महाज्योती’च्या हेल्प लाईन नंबरवर फोन करून या सर्व परीक्षांच्या अर्जाची मुदतवाढ करण्यासंदर्भात विनंती केली होती. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अर्जाची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांच्या यशाची शक्यता अधिक बळकट होईल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी दिली आहे.

राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल ‘महाज्योती’तर्फे उचलले आहे. या योजनेंतर्गत टॅबलेट, 6 GB डेटा प्रतिदिन, नियमित चाचण्या, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वैयक्तिक सल्ला व अभ्यास साहित्य अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत पुरविण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. परिक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहनही इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

फेरफार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती

चित्रीकरण पथके म्हणजे प्रशासनाचे डोळे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

घरो घरी तिरंगा- हर घर तिरंगा ,तिरंगा कॅनव्हाच्या माध्यमातून देशभक्तीचा गौरव नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद पनवेल महानगरपालिकेमार्फत अभिनव उपक्रम..

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नेव्ही नगर येथे भारतीय नौदलातील नौसैनिकांसाठी मतदार जागरूकता अभियान

vishwatmaklokswamivarta

चतुरंगाच्या पन्नाशी निमित्त ११ ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां’ची घोषणा!दिनांक २८ – २९ सप्टेंबरला मुंबईत भव्योदात्त सोहळा!