vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा मुलांनो भरपूर खेळा; पण मैदानावर…मोबाईलवर नव्हे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा मुलांनो भरपूर खेळा; पण मैदानावर…मोबाईलवर नव्हे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- खेळल्याने शारिरीक मानसिक स्वास्थ सुधारते, खिलाडू वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे मुलांनो भरपूर खेळा… पण मैदानावर; मोबाईलवर नव्हे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज विद्यार्थ्यांना खेळण्याचा मंत्र दिला. तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘दररोज एक तास खेळासाठी’ हा उपक्रम सुरु करीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त विभागीय क्रीडा संकूलात आज प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक प्राचार्य यांना प्रोत्साहनपर अनुदान धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू अनिता चव्हाण, डॉ. केदार रहाणे, उद्धव टकले, शशिकांत वडाप तसेच मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्राचार्य खेळाडू आदी उपस्थित होते

प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, हल्ली मोबाईलच्या वापरामुळे मैदाने ओस पडली आहेत. मुले खेळतात पण ते मोबाईल मधले गेम असतात. हे अपेक्षित नाही. मैदानावर खेळ खेळल्याने आपले शारिरीक स्वास्थ्य सुदृढ होते. मानसिक स्वास्थ्य सुधारते. जय पराजय पचवण्याची क्षमता निर्माण होते. शालेय जीवनातील हे क्रीडा विषयक अनुभव पुढे आयुष्यातील विविध प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कामात येतात. आपल्या देशात मुला मुलींनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे. क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना आयुष्यात प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतात. शासनातर्फे त्या उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यामुळे शालेय जीवनापासून क्रीडा कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संकृती निर्माण करण्यासाठी ‘दररोज एक तास खेळासाठी’ हा उपक्रम जिल्ह्यात सुरु करीत असल्याचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी जाहीर केले

जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. उपसंचालक शेखर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.दोन दिवस उपक्रमयाच उपक्रमांचा भाग म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शनिवार दि.३० रोजी सकाळी साडे १० वा. देवगिरी महाविद्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे व्याख्यान होणार आहे. तर रविवार दि.३१ रोजी सकाळी साडेआठ वा. विभागीय क्रीडा संकूल येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे

०००००

संबंधित पोस्ट

बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री मकरंद जाधव-पाटील

वैज्ञानिक बलून उड्डाण; नागरिकांना सापडल्यास स्थानिक तहसिल, पोलीस स्टेशनला कळवावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होऊ देणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

राज्यातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळावे ही शासनाची भूमिका- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील-उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta