vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदेश प्रतिनिधी-महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार
• शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल
• विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार

आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर केले.

सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना
अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे ‘फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या कराराद्वारे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषितंत्रज्ञान, डिजिटायझेशन, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, सामाजिक-आर्थिक सेवा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. या प्रसंगी मुख्य सचिव राजेशकुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच आयोवाचे कृषी सचिव माईक नैग, विकास प्राधिकरण संचालक डेबी दुर्हम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आयोवा हे उत्पादन व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचा हा करार महाराष्ट्रातील शेती, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. आयोवा विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त सहकार्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणले जाईल. भारताने नवीकरणीय ऊर्जेत केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि या करारामुळे या क्षेत्रात आणखी नवे प्रकल्प साकारतील.”
#CM #devendrafadanvis #cmo #maharashtra #mumbai #MoU #Buldhana #buldana #government #governance #america

• गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार

• शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल• विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार

राज्य प्रतिनिधी आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर केले.

सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना

अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे ‘फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या कराराद्वारे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषितंत्रज्ञान, डिजिटायझेशन, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, सामाजिक-आर्थिक सेवा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. या प्रसंगी मुख्य सचिव राजेशकुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच आयोवाचे कृषी सचिव माईक नैग, विकास प्राधिकरण संचालक डेबी दुर्हम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आयोवा हे उत्पादन व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचा हा करार महाराष्ट्रातील शेती, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. आयोवा विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त सहकार्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणले जाईल. भारताने नवीकरणीय ऊर्जेत केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि या करारामुळे या क्षेत्रात आणखी नवे प्रकल्प साकारतील.”

#CM #devendrafadanvis #cmo #maharashtra #mumbai #MoU #Buldhana #buldana #government #governance #america

संबंधित पोस्ट

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिलारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात आज भेट

दिल्लीच्या मराठी संमेलनाविरोधात विद्रोहीचा आवाज घुमणार छ.संभाजीनगरातअध्यक्ष,उद्घाटक व तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका जाहीर !

vishwatmaklokswamivarta

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा जिल्हा दौरा

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta