vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..     

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..

 मुंबई, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात शेतक-यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या. यावेळी उर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा,निता केळकर, संचालक (वित्त) अनुदिप दिघे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे. ऊर्जा विभागाने समस्या लक्षात घेवून मार्गदर्शक सूचना काढाव्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने काम करताना महावितरण,महापारेषण व महानिर्मिती यांच्याशी संवाद वाढवून कामे गतीने करावीत. महापारेषण कंपनीने सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात नफा अंदाजे १८०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. महापारेषण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे मापदंड पूर्ण करत चांगली कामगिरी केलेली आहे. यामध्ये सातत्य राखून आगामी वर्षातही यापेक्षा अधिक सरस कामगिरी महापारेषण कडून होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    0000

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

पलूस महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

इग्नाईट-२०२६’मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण.

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन