vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद, ठाणे“महाश्रमदानः एक दिवस, एक तास, एक साथ” – जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात उपक्रम संपन्न

जिल्हा परिषद, ठाणे“महाश्रमदानः एक दिवस, एक तास, एक साथ” – जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात उपक्रम संपन्न

 

ठाणे प्रतिनिधी, (जिल्हा परिषद, ठाणे) – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “महाश्रमदानः एक दिवस, एक तास, एक साथ” हा विशेष उपक्रम आज, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात संपन्न झाला.    या उपक्रमात पंचायत समिती सदस्य, सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्याचबरोबर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, विभाग प्रमुख, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

      स्वच्छतेच्या या लोकचळवळीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, समाजसेवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उपक्रम यशस्वी केला.

       महाश्रमदानात सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते व महामार्ग, रेल्वे स्थानके, घाट, नाले, धार्मिक व पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, कार्यालयीन परिसर व बाजारपेठा या ठिकाणी व्यापक स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले.

  “ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप मिळाले असून, ठाणे जिल्हा स्वच्छतेच्या दिशेने आदर्श निर्माण करेल,” असा विश्वास जिल्हा परिषदेचे स्वच्छ भारत मिशन विभागाचे विभाग प्रमुख पंडित राठोड यांनी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असणार ..!

vishwatmaklokswamivarta

⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू…

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख

vishwatmaklokswamivarta

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे ‘मेट्रो भवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन