vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अतिवृष्टीमुळे रिपब्लिकन पक्षाचा 68 व्या वर्धापन दिनाचा दिनांक 3ऑक्टोबर चा कार्यक्रम रद्द -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 68 वा वर्धापन दिन आता दिनांक 3 नोव्हेंबर रोजी साजरा होणार*

*अतिवृष्टीमुळे रिपब्लिकन पक्षाचा 68 व्या वर्धापन दिनाचा दिनांक 3ऑक्टोबर चा कार्यक्रम रद्द -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 68 वा वर्धापन दिन आता दिनांक 3 नोव्हेंबर रोजी साजरा होणार*

मुंबई प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.यंदा 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धपन दिन महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या दु:खात सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 68 वा वर्धापन दिन आता 3 ऑक्टोबर ऐवजी पुढील महिन्यात

येत्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी केली आहे.     संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पुरामध्ये गाई,गुरु वाहुन गेली आहे.शेतपीके वाहुन गेली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे अशा काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ऊभे राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने 3 ऑक्टोबरचा 68 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 3 ऑक्टोबर ऐवजी येत्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वांनी मदत केली पाहिजे .रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई,पुणे विविध शहरातील कार्यकर्त्यांनी तसेच उद्येजकांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी आप-आपल्यापरिने पूरग्रस्त संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहान ना.रामदास आठवले यांनी केले आहे

पुरग्रस्त शेतकऱ्यांना चटई,चादर,तांदुळ,पिठ,साखर, तेल साबण असे जीवनाश्यक वस्तु तातडीने पुरग्रस्त शेतकऱ्यांना पाठवण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे. राज्य सरकारने ही तातडीने आर्थिक आणि जीवनाश्यक वस्तुची मदत तातडीने करण्यात यावी अशी सुचना ही ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

 रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 3 ऑक्टोबरचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक 3 ऑक्टोबर ऐवजी 3 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन क्रांतिभूमी महाड जिल्हा रायगड येथे साजरा करण्यात येणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी अधिकृत जाहीर केले आहे.हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख

संबंधित पोस्ट

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी…

vishwatmaklokswamivarta

जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी घालून दिला प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा परिपाठ” – डॉ सुकेश झंवर

vishwatmaklokswamivarta

वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्पास राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय व्दितीय पारितोषिक पर्यावरणाची काळजी घेणारा ‘बदलाचे धागे अर्थात थ्रेड्स ऑफ चेंज’ उपक्रम सर्व शहरांसाठी अनुकरणीय..