vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई / दुबई प्रतिनिधी भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला आहे.भारताचे संविधान साकार करण्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव योगदान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या चळवळीचे मुख्य महत्वाचे उदिष्ट स्वाभिमान जागवणे हेच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकविलेला आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.दुबई येथील डबल ट्री हॉटेल मध्ये स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 चे वितरण केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ना. रामदास आठवले बोलत होते.

स्वाभिमान फाऊंडेशन च्या वतीने स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संविधान फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.तीलक राज मलिक होते.तसेच यावेळी दुबई मधील गल्फ मेडिकल युनिव्हर्सिटी चे संस्थापक डॉ.थंबे मोहिदीन आणि अल् जोहरा हॉस्पिटलचे डॉ.राजु लोचन, फखर सिध्दीकी आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते

.0000

0

संबंधित पोस्ट

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

रशियामध्ये भारताच्या पवित्र बुद्ध अवशेषांचे 50,000 हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन- रशियामध्ये अभूतपूर्व आस्थेचे वातावरण भारताकडून पाठवण्यात आलेले पवित्र अवशेष एलिस्ता येथील प्रतिष्ठित गेडेन शेद्दुप चोइकोरलिंग मठात

vishwatmaklokswamivarta

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक – सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी-दोन्ही देशांतील संवादातून विकासाच्या नव्या संधीचे दालन उघडणार…

vishwatmaklokswamivarta

व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मुंबई शहर व्हिएतनाम करिता पर्यटनाचे ‘गेट वे’ झाले असल्याची राष्ट्राध्यक्षांची भावना*  

इराणला शस्त्रास्त्रे पुरवल्यास ५०% दंड!’ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला कडक इशारा! 🇺🇸🔥 

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन.