vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एमएसआरडीसी’चे रस्ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

एमएसआरडीसी’चे रस्ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणारी सर्व कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

निर्मल भवन, नरिमन पॉईंट येथील ‘एमएसआरडीसी’ कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहसंचालक मनूज जिंदल, तसेच भू-सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक रामदास खेडेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीच्या सुलभतेसाठी काटेकोरपणे कामे करावीत. प्रकल्पाच्या गतीमध्ये दिरंगाई चालणार नाही. प्रत्येक प्रकल्पाच्या तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून या कामांमुळे अंतर कमी होणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असून यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

बैठकीत रेवस-रेड्डी राष्ट्रीय महामार्गातील गुहागर तालुक्यातील १३ ते १५ कि.मी रस्त्याचे पुनःसर्वेक्षण व फेररचना, विरार-अलिबाग महामार्ग, नाशिक शहर वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) तसेच भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या प्रगती अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्र्यांनी शिर्डीत घेतला जनता दरबार

नगरपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी*

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा

विकसित भारत जी राम जी – ग्रामीण रोजगाराला नवी दिशा- १२५ दिवसांची रोजगार हमी- ३१८ प्रकारच्या विकासकामांना चालना

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta