vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

         अमरावती, प्रतिनिधी: दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अमरावती शहरात आज ‘भव्य एड्स जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले. ‘अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू’ या घोषवाक्यासह शहरातील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

    जिल्हा सामान्य रुग्णालयातून या रॅलीला महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचानालयाचे संचालक डॉ. विनोद कंदेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कंदेवाड यांनी जिल्ह्याने एचआयव्ही संक्रमणाचा टक्का कमी केल्याबद्दल कौतुक केले. सर्वसमावेशक जनजागृतीने एचआयव्हीच्या जनजागृती कार्यक्रमास मदत होईल आणि आपण निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

   जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेली ही रॅली रेल्वे कॉटन मार्केट, राजकमल, श्याम चौक मार्गे पुन्हा इर्विन चौकातून जिल्हा सामान्य रुग्णालयात समारोपित झाली. रॅलीत वैद्यकीय, नर्सिंग, समाजकार्य, कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. तसेच, अति जोखमीच्या गटांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचे माहिती रथ यात समाविष्ठ होता, ज्यातून समुपदेशन आणि सुविधांची माहिती देण्यात आली. या यशस्वी आयोजनात अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

0000000

संबंधित पोस्ट

दंत आणि नेत्र शिबीराचा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतला लाभनवीन महाराष्ट्र सदनात शिबीर संपन्न..

जागतिक सिकलसेल दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “सिकलसेल जनजागृती पंधरवडा”दि. १५ ते ३० जून २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिकलसेल, थॅलेसेमिया, हेमोफिलिया जनजागृती सप्ताह 

vishwatmaklokswamivarta

गोटपॉक्स लसीकरणांतर्गत पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

जिल्हा आरोग्य विभागाकडून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला गतीNQAS अंतर्गत आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्यावर भर; ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन प्रमाणपत्र प्राप्त

विशेष वृत्त -जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत मागील तीन महिन्यात 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत…