vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती व #राष्ट्रीययुवादिन उत्साहात साजरा

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती व #राष्ट्रीययुवादिन उत्साहात साजरा

 

नांदेड, प्रतिनिधी : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा व मूल्यांचा प्रसार करणे, तरुणांना देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करणे तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे हा या दिनाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे

राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य, त्यांचे प्रेरणादायी विचार यावर प्रकाश टाकण्यासाठी मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय कीर्तनकार श्री. जी. बी. गिरोड यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून अत्यंत विनोदी, मार्मिक आणि प्रभावी शब्दांत प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. समाजप्रबोधनपर विचार मांडताना त्यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच चांगले विचार व सवयी अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी होते. कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. हर्षद शहा, उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड, तसेच संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनिदेशक एस. जी. सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय दिव्यांगत्व कल्याण समिती आढावा बैठक,दिव्यांग कल्याण योजनांचा निधी वेळेत खर्च करा- उपजिल्हाधिकारी राठोड

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

सर्वसमावेशकतेमुळे मराठी भाषा समृद्ध – सांस्कृतिक कार्यमंत्री. आशिष शेलार

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम