vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

गोदाकाठच्या पूरग्रस्तांना ‘समृद्धी’ने दिला माणुसकीचा हात…

गोदाकाठच्या पूरग्रस्तांना ‘समृद्धी’ने दिला माणुसकीचा हात…

राज्य प्रतिनिधी-अंबड: गोदावरी नदीला विक्रमी महापूर आला आहे. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे गोदाकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. पूरग्रस्त गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी कर्मचारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत मदतकार्य केले. तसेच पूरग्रस्त कुटुंबांसाठी तातडीने ‘अन्नछत्र’ सुरू करून जेवणाची व्यवस्था केली आहे.

गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी रविवारी रात्री भाजपा नेते तथा समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी पुढाकार घेतला. कारखान्याचे कर्मचारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी गोदाकाठच्या शहागड, वाळकेश्वर, गंगा चिंचोली, गोंदी, हसनापूर ,कोठाळा, घुंगर्डे हादगाव, साष्ट पिंपळगाव ,गोरी -गंधारी या गावांतील पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि मदत कार्य केले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्यांनी स्थानिक यंत्रणांना सहकार्य केले. तसेच, सोमवारी अन्नछत्र सुरु करून, पूरग्रस्त कुटुंबांच्या निवासाच्या ठिकाणी जाऊन समृद्धी जेवण पुरविण्याचे काम सुरु केले आहे. या माणुसकीच्या मदतीने संकटकाळात लोकांना मोठा दिलासा मिळाला आह

प्रतिक्रिया……

” जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला विक्रमी महापूर आला आहे. नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सहकार्यातून वेळीच स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. या पूरस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी समृद्धी कारखान्याचे सर्व कर्मचारी आणि भाजपचे कार्यकर्ते सज्ज आहेत.”- सतीश घाटगे( चेअरमन, समृद्धी साखर कारखाना तथा नेते, भाजप)

संबंधित पोस्ट

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी…

भारतीय जनता पार्टी ने उमेदवारी दिल्यास प्रभाग क्र. 03 (अ) मध्ये प्रचंड ताकदीने निवडणूक लढवणार – अ‍ॅड.भगवान चांदोडे*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम सुधारित उत्तरसूचीबाबतआक्षेप असल्यास दि.10 फेब्रुवारी पर्यंत नोंदवावा..

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत 6 हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन.चैत्यभूमी येथेही ज्ञानस्मारकाची माहिती देणारा स्टॉलचैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाची ज्ञानस्मारकात थेट प्रक्षेपण व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार राज्याच्या सागरी उद्योग क्षेत्राची नवी भरारी

vishwatmaklokswamivarta