vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली जलद गतीने न्याय मिळण्यासाठी न्यायदान साखळीतील कमतरता दूर करण्यात येत आहे. नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत जलद न्यायाला प्राधान्य दिले असून त्यानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया जलद झाली आहे.

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचित केले. तसेच त्यांनी नियमित आढावा घेत या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची प्रक्रिया गतिमान केली. संचालनालयाकडील प्रयोगशाळांमध्ये २०२५ मध्ये एक लाख ८१ हजार प्रकरणे प्रलंबित होती. तसेच दोन लाख ९४ हजार इतकी प्रकरणे आवक झाली. संचालनालयाने विशेष मोहिम राबवून डिसेंबर २०२५ अखेर तीन लाख ९६ हजार ८७९ इतक्या प्रकरणांचा निपटारा करून ७९ हजार ५४२ इतकी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी केली आहे.

संबंधित पोस्ट

जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत दहशतवादी कट उघड करणारे IPS अधिकारी गुरप्रीत सिंह भुल्लर यांची बदली!

vishwatmaklokswamivarta

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न 

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

शिर्डीचे साईबाबा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सचिव राजेश अग्रवालसिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta