vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश…

हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश…

      अमरावती, प्रतिनिधी: प्राथमिक आरोग्य केंद्र, हरीसाल येथील वैद्यकीय पथकाने दाखवलेली तत्परता आणि समन्वयामुळे एका मातेचे प्राण वाचले आहेत. प्रसूतीनंतर अचानक सुरू झालेला अतिरक्तस्त्राव पीपीएच नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले आहे.

    सोसोखेडा उपकेंद्रातील नांदुरी येथील सुशीला सावलकर, वय 28 वर्षे यांना प्रसूतीसाठी 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1.10 वाजता हरीसाल आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविका सोनिया कंडुलना यांनी तातडीने तपासणी केली असता, प्रसूतीची वेळ जवळ असल्याचे लक्षात आले. डॉ. मोनिका कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रसूती प्रक्रीया पार पाडली आणि अवघ्या 5 मिनिटांत म्हणजेच 1.15 वाजता महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला.

    अचानक ओढवलेल्या प्रसूतीनंतर काही वेळातच मातेची प्रकृती खालावली आणि तिला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे रक्तदाब कमी होवून रूग्ण धापा टाकू लागला. ही स्थिती मातेच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक होती.

   परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य सेविका मंगला बोरकर आणि सुनिता खेडकर यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. संपूर्ण टीमने एकाच वेळी कामाला सुरवात केली. दोन्ही हातातून जीवनरक्षक औषधे आणि सलाईन वेगाने सुरू करण्यात आले. गर्भाशयाचा मसाज करून रक्तस्त्राव थांबविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रूग्णाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून तिला तातडीने धारणी उपजिल्हा रूग्णालय येथे संदर्भीय सेवा देण्याची तयारी केली.

     पहाटे 4.25 वाजता रूग्णाला पुढील उपचारासाठी धारणी येथे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, रूग्णवाहिकेतील प्रवासादरम्यानही आरोग्य सेविका सोनिया कंडुलना यांनी रक्तस्त्राव नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली. वेळेवर घेतलेला अचूक निर्णय आणि आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे सुशीला सावलकर यांना जीवनदान मिळाले आहे. या यशस्वी कामगिरीबद्यल डॉ. मोनिका कोकाटे, सोनिया कंडुलना, मंगला बोरकर आणि सुनीता खेडकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – डॉ. ओमप्रकाश शेटे

vishwatmaklokswamivarta

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ बाबत आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी 

भारतीय बालरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.तरूणा छाबडा तर सचिव डॉ. नामदेव वाघ

जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम

कुटुंब नियोजन क्षेत्रात उकृष्ट कार्य करणारे ६५ कर्मचारी सन्मानीत

आरोग्य यंत्रणांचा आढावाजिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करा-जिल्हाधिकारी स्वामी