vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी- श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित भव्य सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून करण्यात आली

​यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, बलदेव सिंग वाही, अमरप्रीत वाही, अमनदीप वाही, अश्विंदर मल्होत्रा, ब्रह्मा लोंगियानी, मोंटू लोंगियानी, इकजस नारंग, गुरजस नारंग, हरप्रीत नारंग, कुलबीर सिंग वाही, रविंदर सिंग नारंग आदी मान्यवर उपस्थित होते.

​जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरू झालेली ही रॅली सुरभी हॉस्पिटल, गुलमोहर पोलीस चौकी, श्रीराम चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, नायरा पेट्रोल पंप, दिल्ली गेट, मार्केट यार्ड, कोटला स्टँड आणि डीएसपी चौक मार्गे मार्गक्रमण करत भाई दया सिंह जी गुरुद्वारा येथे पोहोचली. तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

​या सायकल रॅलीमध्ये युवक-युवती, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था, सायकलिंग क्लबचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “निरोगी राहा, सायकल चालवा” तसेच “धर्म, एकता आणि सेवाभाव” असा संदेश देत ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

00000

संबंधित पोस्ट

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान; डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार देशातील २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

vishwatmaklokswamivarta

खेड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी सरपंचांविरोधात कारवाई सुरू- मंत्री जयकुमार गोरे

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..