vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

 लातूर, खेळ प्रतिनिधी : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या केंद्रांमुळे राज्यातील तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी उच्च दर्जाचे निवासी प्रशिक्षण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध होणार आहे.

या योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स आणि कुस्ती या प्रत्येक खेळासाठी २० खेळाडू (एकूण ४०) यांची निवड करण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष किंवा dyd.syslatur@rediffmail.com (mailto:dyd.syslatur@rediffmail.com) या ई-मेलवर दिनांक २० मार्च २०२६ पर्यंत सादर करावेत.

पात्रता निकष :वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०२६ रोजी २५ वर्षांखालील मुले व मुलीमहाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक (अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य)राज्यस्तरीय पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभाग (SGFI, AFI, Khelo India National स्पर्धा फक्त)गेल्या २ वर्षातील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्रक्रीडा कौशल्य आणि तंदुरुस्ती (फिटनेस) चाचण्या उत्तीर्ण होणे आवश्यकशासन मान्यता प्राप्त डॉक्टरांकडून वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे :जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,आधारकार्ड,मागील २ वर्षातील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र,पासपोर्ट साइज ३ फोटोग्राफ,शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र,पालकांचे संमती पत्र,निवड झालेल्या खेळाडूंना निवासी क्रीडा प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, क्रीडा साहित्य, स्पर्धांचे आयोजन, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, करियर मार्गदर्शन, क्षमता विकास कार्यक्रम (देशी-विदेशी संस्थांच्या सहकार्याने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच, निवास, भोजन, पुरक आहार, क्रीडा साहित्य, देशांतर्गत व परदेशी प्रशिक्षण, स्पर्धा सहभागाचा खर्च, वैद्यकीय चाचण्या व किरकोळ वैद्यकीय खर्च विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग यांच्यामार्फत पुरवला जाईल.

मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग महादेव कसगावडे यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 30 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन   

vishwatmaklokswamivarta

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ