vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव…

मुंबई, प्रतिनिधी: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव, मुंबई येथे नागरिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन सर्वसामान्यांना घडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या चित्ररथाने राष्ट्रीय पातळीवर विशेष छाप पाडत देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. विविध सांस्कृतिक घटकांचे सजीव आणि आकर्षक सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आले असून, राज्याच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला आहे.

या चित्ररथाच्या साकार प्रक्रियेत विविध कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी योगदान दिले असून त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रजासत्ताक दिन संचलनात मिळालेल्या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे

गिरगाव परिसरातील या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन, सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत…केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे वाचन*

vishwatmaklokswamivarta

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील पुनर्वसन धोरण नव्याने करणार

100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी गती!विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना दावोस 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 51 करारांपैकी 17 ला मंजुरी,एकूण गुंतवणूक ₹3,92,056 कोटी