vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बप्पी लाहिरी यांच्या संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्गा’चे नामकरण

बप्पी लाहिरी यांच्या संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्गा’चे नामकरण

मुंबई, प्रतिनिधी : दिवंगत संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी आपल्या संगीताने, गीतांनी आणि अनोख्या शैलीने अनेक दशके संपूर्ण संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या संगीताचा प्रभाव देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचला. त्यांची अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. बप्पी लाहिरी यांचे जीवन आणि संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंधेरी येथील जुहू परिसरात दिवंगत संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांच्या निवासस्थानाजवळील मार्गाचे ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ गायक उदित नारायण यांच्यासह चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर, तसेच बप्पी लाहिरी यांचे कुटुंबीय आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बप्पी लाहिरी यांच्या स्मृतींना उजाळा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बप्पीदा हे केवळ एक लोकप्रिय संगीतकार नव्हते, तर त्यांनी आपल्या संगीताद्वारे अनेक पिढ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. त्यांनी संगीतविश्वात अनेक नवे प्रयोग केले. विशेष म्हणजे, भारताबाहेरही त्यांच्या गाण्यांना मोठी लोकप्रियता मिळाली असून, रशियन फेडरेशनमध्येही त्यांची गाणी आजही मोठ्या प्रमाणावर गायली आणि ऐकली जातात.आजचा हा कार्यक्रम केवळ मार्गाच्या नामकरणापुरता मर्यादित नसून, त्यांच्या समृद्ध जीवनाचा आणि संगीतप्रवासाचा गौरव करण्याचा आहे. त्यांच्या गाण्यांचे स्मरण हा एक संगीतमय प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आठवणींसोबतच त्यांची असंख्य गाणी आपल्या मनात पुन्हा जागी होतात. त्यांच्या जीवनाचा गौरव करण्याची संधी मिळणे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बप्पी लाहिरी यांच्या नावाने या मार्गाचे नामकरण करून त्यांच्या संगीतक्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या स्मृती जतन करण्याचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

श्रीगोंदा येथील क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलश्रीगोंदा येथे ८.५० कोटींच्या सुविधायुक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न-नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

श्री सिद्धिविनायक मंदिरात  ‘माघी गणेश जयंती महोत्सवा’ची सुरुवात; गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर भव्य सोहळा..

vishwatmaklokswamivarta

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न