vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

रायगड अलिबाग, प्रतिनिधी:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ज्यांना दुचाकी वाहनांकरिता आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि.23 एप्रिल 2026 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिहवन अधिकारी पनवेल यांनी केले आहे.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि. 24 एप्रिल 2026 रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा धनाकर्ष (DD) बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा. या अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

अर्जदार यांना सर्व साधारण सूचना पुढीलप्रमाणे :-सदर धनाकर्ष (DD) RTO PANVEL यांच्या नांवे नॅशनलाईज्ड / शेड्युल्ड बँकेचा असावा, तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अर्जदाराने अर्जासोबत पॅनकार्ड, ई-आधारकार्ड तसेच पत्त्याचा पुरावा साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा धनाकर्ष (DD) या सिलबंद पाकीटात जमा करावा. आकर्षक क्रमांकासाठी आलेल्या अर्जासोवत असणारे धनाकर्षण अर्ज स्विकारणाऱ्या दिवसापासून दोन महिन्यापेक्षा जुने असलेले धनाकर्षणाचे अर्ज बाद केले जातील. तसेच विहित शुल्कापेक्षा कमी रक्कमेचे असलेले धनाकर्षण (DD) सुद्धा बाद केले जातील. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. आकर्षक क्रमांकासाठी आगाऊ स्वरुपात अर्ज स्विकारत असून चालू मालिका संपल्याशिवाय नवीन मालिका सुरु होणार नाही. तसेच आगाऊ प्रक्रियेमध्ये स्विकारलेल्या अर्जाच्या धनाकर्षण च्या पावत्या, जुन्या मालिकेतील पूर्ण नंबर संपल्याशिवाय नवीन मालिकेतील पावत्या जारी केल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. अर्जदारांना https://fancy.parivahan.gov.in, या संकेत स्थलाद्वारे याबाबतची अधिक माहिती उपलब्ध आहे

0000000

संबंधित पोस्ट

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी(दि.२८)

vishwatmaklokswamivarta

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश…

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश· कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा..

विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यातून समाजविकासाला बळ : जय हनुमान मित्र मंडळाचा उपक्रम उत्साहात

vishwatmaklokswamivarta