vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिताअभ्यास गट गठीत करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिताअभ्यास गट गठीत करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामगार मंत्री बोलत होते.

बैठकीस आमदार शंकर जगताप, अपर मुख्य सचिव श्रीमती आय. ए कुंदन, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदींसह आय टी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड फुंडकर म्हणाले, आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारी जबरदस्ती, अन्यायकारक राजीनामा घेण्याची प्रक्रिया आणि एचआर (HR) नियमांमधील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट गठीत करण्यात यावा.

आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जबरदस्तीने राजीनामा देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करावी. एचआर नियम आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या पद्धतींचे नियमन झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असलेले आणि जुन्या कंपनीने ‘ डी लिंक ‘ न केलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कळविण्यात यावे. याबाबत पत्रव्यवहार करून अशा कर्मचाऱ्यांना मदत करावी.

शॉप ॲक्ट परवाना असलेल्या प्लेसमेंट एजन्सींची माहिती घ्यावी. अनेकदा प्लेसमेंट एजन्सींच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्तीत अनियमितता आढळते. त्यामुळे अशा सर्व एजन्सींच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची सत्यता तपासण्यात यावी. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी. कामगार विभागाच्या सीआयएस प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी कशा नोंदवता येतील, याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथकाद्वारे धडक मोहीम सुरू- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर· दोषींवर मकोका लागू करण्यासाठी कायदा आणणार

हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…