vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आदिवासी आश्रमशाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी  आज शहापूरमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

आदिवासी आश्रमशाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी  आज शहापूरमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी: राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविणे आणि त्यातील अडचणींवर मात करण्यासाठी उद्या, ७ मे २०२६ रोजी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथे एका भव्य एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

आदिवासी विकास मंत्री यांच्या संकल्पनेतून होणारी ही कार्यशाळा ‘आत्मा मालिक शैक्षणिक संकुल’ येथे पार पडणार असून यावेळी स्वतः आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्यासह सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे आदिवासी विकास अपर विकास आयुक्त गोपीचंद कदम,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

        या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वाजता नोंदणी आणि चहा-नाष्ट्याने होईल. त्यानंतर, विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रकल्प अधिकारी, शहापूर यांनी तयार केलेल्या विशेष प्रचार प्रसिद्धी वाहनाचे उद्घाटन करण्यात येईल. या कार्यशाळेत केवळ नियोजनावरच चर्चा होणार नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या आणि परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळविलेल्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा विशेष गौरवही केला जाणार आहे.

  कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘Shaping Futures: A journey of tribal development in Palghar’ या कॉफी टेबल बुकलेटचे अनावरण आणि शाळा प्रवेशोत्सवासाठीच्या ‘जिंगल’चे लोकार्पण. जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या ‘बेंगलोर भेट’ या नाविन्यपूर्ण योजनेची माहिती चित्रफीतही यावेळी दाखविण्यात येईल

  दुपारच्या सत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत (NEP) सखोल मार्गदर्शन केले जाणार असून, नाशिक आणि ठाणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्रमशाळांमधील सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि गुणवत्ता वाढीचा आराखडा सादर करतील. या कार्यशाळेत विविध प्रकल्पांचे मुख्याध्यापक, गृहपाल आणि अधीक्षक यांच्याशी थेट संवाद साधला जाणार असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांनी दिली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’ भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजी* ग्रामीण भागातील गुणवंत आता होणार ‘आयएफएस’ अधिकारी* ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला कार्यकारिणीचा-भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते सत्कार

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार-गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर*धारणी पोलीस स्टेशनला भेट*अभ्यासिकेत पुस्तकांचे वाटप

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील