vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा येथे उभारण्यात येणारे ‘माजी सैनिक एकात्मिक संकुल’ हे राज्यात आदर्श ठरावे – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा येथे उभारण्यात येणारे ‘माजी सैनिक एकात्मिक संकुल’ हे राज्यात आदर्श ठरावे – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा , प्रतिनिधी– सातारा शहरात माजी सैनिक कल्याण विभाागाकडील जागेमध्ये भव्य आणि आदर्श असे माजी सैनिक एकात्मिक अद्ययावत संकुल उभारावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज याविषयी बैठक संपन्न झाली.

बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकरी सतेश हंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, करंजे येथील माजी सैनिक कल्याण विभागाकडे असलेल्या 11 एकर जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या या संकुलामध्ये भव्य मॉल उभारावा, त्यामध्ये बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी किमान 25 टक्के जागा राखीव असावी. तसेच त्यात कॅफेटेरिया व कॅन्टीनची सोय ही असावी. या जागेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी करावी व नेमण्यात आलेले वास्तुविशारद यांच्याशी चर्चाकरुन 15 दिवसात त्याचा आराखडा तयार करावा. त्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास तेथील जुनी बांधकामे काढावीत आणि सद्यस्थितीतील काही कार्यालये व संकुले तात्पुर्ती स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव सैनिक कल्याण कार्यालयाने सादर करावा. सद्यस्थितीत ही जागा राज्यपाल महोदयांच्या मालकीची आहे. जागा अधिग्रहणासाठीचा सविस्तर प्रस्ताव 15 दिवसात सादर करावा. राज्यपाल महोदयांकडे मागणी करुन पाठपुरावा करता यईल.

सातारा येथे उभारण्यात येणारे माजी सैनिक कल्याण संकुल हे राज्यात आदर्श ठरेल असे उभाारावे. तसेच या ठिकाणी भेट देणाऱ्यांसाठी अद्ययावत सर्व सोयी सुविधा उभरा्व्यात अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसएमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार*

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…