vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉

लातूर प्रतिनिधी -खरोळा जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन सौ. शिवकन्याताई महेंद्र गोडभरले (सभापती, जि.प. लातूर) यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर दोन शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन दिले होते

मागणीप्रमाणे या अगोदर एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती, आणि आज दुसऱ्याही शिक्षकाची नियुक्ती करत, ते आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे, शाळेसाठी दोन्ही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

शब्द आणि कृती यांचा सुंदर मेळ घालत शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या शिवकन्याताईंचे मनःपूर्वक आभार! 🙏

विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेले हे पाऊल निश्चितच खरोळा गावासाठी अभिमानास्पद असून, शिक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे आहे.मनापासून धन्यवाद, शिवकन्याताई! 💐💐

संबंधित पोस्ट

विधान परिषद प्रश्नोत्तरे-जल जीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगतीपथावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करणार-पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश**धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध*

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पॉश” ची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा