vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

राज्य प्रतिनिधी-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक घेतली. रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व अन्य संबंधित उपस्थित होते.

मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार जाणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी.

या प्रशिक्षणात सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार असून, प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यांनी विनामूल्य उपलब्ध असलेले ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रशिक्षण घेऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी असे परिवहन मंत्री म्हणाले

संबंधित पोस्ट

पालकमंत्र्यांनी घेतला विभागनिहाय आढावा

vishwatmaklokswamivarta

स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ,आपल्या मुलींचे संरक्षण ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

वोडाफोन आयडिया कंपनीवर 32 लाख रुपयांचा रायगड ग्राहक मंचात दावा दाखल…