vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

मुंबई प्रतिनिधी-चर्नीरोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते #जवाहरबालभवन च्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी #बालभवन च्या नूतन वास्तूची पाहणी केली.

महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल, असे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिका निवडणूक -2026 काँग्रेस-वंचित यांच्यात युती:महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान

vishwatmaklokswamivarta

घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीसाठी क्लस्टरला मंजुरी,माथाडींच्या साडेतीन हजार धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार नवी मुंबई महापालिकेने प्रसिध्द केली अधिसूचना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांना यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रम प्रदर्शनाचे आयोजन कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकासाचे नियोजन-वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत 

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर ठेवा* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा अत्यावश्यक असल्याशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये*