vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आंबेनळी घाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा;पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाला निर्देश

आंबेनळी घाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा;पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाला निर्देश

सातारा प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात काल मध्यरात्री झालेला स्कॉर्पिओ गाडीचा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघातात आठ युवकांचा मृत्यू झाला असून, या घटनेवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तात्काळ सातारा आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बचावकार्याबाबत आणि पीडित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रायगड व सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड आणि पोलादपूर येथील ट्रेकर्स संस्थांसह स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या अंधारातच दरीत उतरून तात्काळ शोध व बचाव कार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून प्रशासकीय सोपस्कार गतिमान करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले आहेत.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीचा क्रमांक MH 11 DN 2340 असा असून, यामध्ये एकूण आठ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, अवघड वळणावर वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या अपघातामध्ये आसगाव ता. सातारा येथील चार, बोरगाव ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथील एक, मर्ढे ता.जि. सातारा येथील दोन, खटाव ता. खटाव जि. सातारा येथील एक अशा आठ युवकांचा अपघातात मृत्यु झाला आहे. आम्ही या संपूर्ण घटनेवर आणि त्यानंतरच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवून आहेत. दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक माझ्या सतत संपर्कात आहेत. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण पाठीशी आहोत, अशा भावनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केल्या.

00000

 

 

0000

संबंधित पोस्ट

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबतची कार्यशाळा कायद्याचा पाया मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल- जिल्हाधिकारी अशोक काकडे,महसूल अधिकारी, सरकारी वकीलांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबत प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

vishwatmaklokswamivarta

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचा संवाद

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

vishwatmaklokswamivarta