vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध

नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध

 

अमरावती, प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२७ च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता अमरावती येथील ‘भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र’ (युपीएससी) यांच्यातर्फे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राच्या संचालिका डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

  प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी १ ते १७ जून २०२६ पर्यंत असणार आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम मुदत १९ जून २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे. ही ऑफलाइन प्रवेश परीक्षा १९ जुलै २०२६ (रविवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाईल. या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना ह्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संबंधित पोस्ट

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने“जय शिवाजी जय भारत”पदयात्रेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज मानधन योजना ;जेष्ठ साहित्यिक, कलावंतांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार