vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

धक्कादायक! चोरीच्या हेतूने गळा चिरुन रेल्वे ट्रॅकवर फेकलं, डोंबिवली पुन्हा हादरली

 धक्कादायक! चोरीच्या हेतूने गळा चिरुन रेल्वे ट्रॅकवर फेकलं, डोंबिवली पुन्हा हादरली

प्रतिनिधी डोंबिवली: डोंबिवलीत  कायदा सुव्यवस्था उरली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने डोंबिवली हादरली होती. आता पुन्हा एकदा डोंबिवलीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

डोंबिवलीमधल्या ठाकुर्ली 90 फिट रोडवर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने दोन प्रवाशांवर हल्ला केला. रिक्षातून आलेल्या या इसमाने आधी या दोन प्रवाशांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने एका प्रवाशाचा गळा चिरला आणि त्याला रेल्वे ट्रॅकवर फेकून दिलं. या दुसरा प्रवासी झाडीमध्ये लपल्यानं त्याचा जीव वाचला.

मृत व्यक्तीचं नाव बेलप्रसाद चौहान असं आहे. तर जखमी प्रवाशाचं नाव बबलू चौहान आहे. लूटीच्या हेतून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

शिवसेना कोणाच्या बापाची नाही, वर्षानुवर्षे काम करुन पक्ष वाढवला- भावना गवळी

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाणे जिल्ह्यातील “कल्याण” मध्ये संपन्न*

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशासह विविध परवानगीचे वितरण

शनिवार 14 डिसेंबर सद्गुरू गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त-  श्रीगुरुदेव दत्त प्रतिके  काषायवस्त्रं करदंडधारिणम ,कमंडलु पदमकरेंण शंखम।चक्रगदाभूषित भूषषाढ्यम,श्रीपदराजंम शरणं प्रपंद्ये ।।

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आज देणार थोड्याच वेळात निकाल…

vishwatmaklokswamivarta